Worklife

Verily none can ever remain for even a moment without performing action; for, everyone is made to act helplessly indeed by the qualities born of Nature. Bhagvadgita Ch 3.5 So life is embedded with work and it's balance too. Ftness of body and mind will help you build better careers and businesses.

First generation settlers can find help at 1st Generation settling in Thane.

Encourage each family member to explore their potential at school, college, job, office and retirement phase. Take this aptitude test to understand your potential.

Events: 

मातृभाषेसाठी....
निसर्ग मित्र आयोजित 
        
  * एका सायकल प्रवाशाचे अनुभव कथन.....

#भाषारत #सायकलोपासना

भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी 20,000 कि.मी., 23 राज्यातूनसायकलवरून एकट्याने भारत भ्रमण  
केलेल्या कु. गंधार कुलकर्णी याचे  दृक्-श्राव्य माध्यमातून अनुभव कथन.

वेळ- शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2019 
सायंकाळी- 6.00 ते 8.00

ठिकाण- कृष्णभारती सभागृह, 
 गोदरेज प्लाझा समोर, जुने पनवेल 
फी--नि:शुल्क

भारतीय भाषा आणि बोलीभाषेला प्रोत्साहन देण्यासाठी एका तरुणाने देशभर सायकलवारी केली. हा तरुण आहे डोंबिवलीचा गंधार कुलकर्णी. गंधारने १ जुलै २०१८ पासून सुरू केलेल्या या मोहीमेत देशातील २३ राज्यांतून, सुमारे २० हजार किलोमिटर प्रवास केला आहे. 
भारतात विवीध भाषांबरोबरच बोली भाषा आहेत. या भाषांच्या संवर्धनासाठी व स्थानिक भाषांची स्थिती काय आहे, त्या जपण्यासाठी काय आवश्यकता आहे ह्याचा शोध घेण्यासाठी हा प्रवास होता. कालिदासाच्या 'मेघदूत' चा आधार घेत त्याचा प्रवासमार्ग ठरला होता.
गंधारचे हे अभ्यासपूर्ण अनुभव कथन  आपापल्या मातृभाषेवर प्रेम करणा-या आपण सर्वांनी मित्रांसह संपूर्ण कुटुंबाने ऐकण्यासाठी यावे ही विनंती.
कार्यक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी वेळेतच सुरू होईल 
आयोजक- निसर्गमित्र, पनवेल.